scorecardresearch

मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.

२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.

जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत गुलाम नबी आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली होती.
Read More
sonia gandhi and mallikarjun kharge
“काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे योग्य नेते,” सोनिया गांधी यांच्या विधानानंतर तर्क-वितर्कांना उधाण!

गेल्या वर्षात खरगे यांनी सोनिया गांधी यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

congress president mallikarjun kharge got angry addressing workers in telangana video viral
“ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर…”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कार्यकर्त्यांवर संतापले, म्हणाले… ; पाहा Video

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा हा व्हिडीओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पोस्ट करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला…

Mallikarjun Kharge clearly said Census according to caste if Congress government comes
मल्लिकार्जुन खरगे स्पष्टच म्हणाले, ‘काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना’

केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

world cup 2023 jeetega india Congress leaders enjoy India-Australia CWC 2023 final match in new delhi AICC congrees headquarters
“इंडियाच…”, काँग्रेस नेते एकत्र बसून घेतायत भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचा आनंद, पाहा Video

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काँग्रेस नेते एकत्र बसून भारत- ऑस्ट्रेलिया संघाच्या लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

Mallikarjun Kharge, congress, president
मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसला वर्षभरातच नवा सूर मिळवून दिला… प्रीमियम स्टोरी

काँग्रेसचे नवे अध्यक्ष रबरस्टॅम्पप्रमाणे काम करतील हा विरोधकांचा आणि पत्रकारांचा दावा खरगेंनी खोटा ठरवला आहे. काँग्रेसअध्यक्ष खरगेंच्या वर्षपूर्तीनिमित्त-

MALLIKARJUN KHARGE
पाचही राज्यांत आमचीच सत्ता येणार -मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा; २०१८ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

केंद्रातील भाजपा सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप खरगे यांनी केला.

india alliance future in danger, congress mla sukhpal singh khaira arrested, punjab congress mla arrested by aap
‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य धोक्यात ? काँग्रेस आणि आपमधील दरी रुंदावली

आमदारच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत ‘आप’ला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे.

congress chief mallikarjun kharge vows to amend women bill if congress comes to power
सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा -खरगे

जेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि आम्ही मिळून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थापना केली तेव्हा भाजपच्या मनात महिला विधेयक आले.

Rahul Gandhi JP Nadda
Women’s Reservation Bill : “अमेठी, रायबरेली, कलबुर्गी मतदारसंघ आरक्षित केले तर…”, भाजपाचा काँग्रेसला टोला

भाजपा खासदार जे. पी नड्डा म्हणाले, मी आत्ता सरकारमध्ये आहे. आम्हाला वाटेल तो मतदारसंघ आम्ही महिलांसाठी आरक्षित केला तर चालेल…

mallikarjun kharge
“महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर केलं”, मल्लिकार्जुन खरगेंचा संसदेत दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ सप्टेंबर) महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×