Now Gujrat election commission will concentrate on duplicate voters | Loksatta

गुजरात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी, दुबार मतदारांवर आयोगाची करडी नजर

गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मतदारांची संख्या, महिला मतदार नोंदणीसंदर्भातील आव्हाने याबाबत माहिती दिली.

गुजरात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी, दुबार मतदारांवर आयोगाची करडी नजर

गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. आम आदमी पार्टीने तर आत्ताच १९ उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे. मात्र ही निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची तयारी नक्की कशी सुरू आहे हे आम्ही जाणून घेतले. गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मतदारांची संख्या, महिला मतदार नोंदणीसंदर्भातील आव्हाने, डुप्लिकेट मते ओळखण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलीजन्सचा वापर  निवडणूक आयोगाची तयारी आणि मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाच्या योजना याविषयी सांगितले. 

किती मतदार मतदानाचा हक्क बजावतील?

१२  ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार, ४.८३ कोटी पात्र मतदार आहेत. यामध्ये २.५ कोटी पुरुष आणि २.३३ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ४.३५ कोटी पात्र मतदार होते. आम्ही १२ ऑगस्ट रोजी विशेष सारांश पुनरावलोकन (एसएसआर) सुरू केलं आहे. महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेच्या शेवटी आम्हाला आणखी ३ ते ४ लाख मतदार जोडण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रारूप मतदार यादीत त्यांची नावे तपासू शकतात आणि गरज भासल्यास बदल करू शकतात. १० ऑक्टोबर रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक आयोगासमोरील आव्हाने

आपण पाहत असलेल्या आव्हानांपैकी पाहिले आव्हान नव्या मतदारांची नोंदणी करणे. १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या एकूण मतदारांपैकी ३.६६ टक्के आहे. परंतु आम्ही आता १ टक्क्यावर आहोत. सध्या राबविण्यात येत असलेला १८- १९ वयोगटातील जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यावर लक्ष केंद्रित आहे. जनगणनेनुसार गुजरातचे लिंग गुणोत्तर ९१८ आहे आणि मतदार यादीचे लिंग गुणोत्तर ९३४ आहे. तर १८-१९ मतदार गटातील लिंग गुणोत्तर ६६० आहे. याचा अर्थ प्रत्येक अर्थ प्रत्येक १००० पुरुष मतदारांमागे फक्त ६६० महिला मतदार आहेत आणि तरुण महिला मतदारांची नोंदणी होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

दुबार मतदार नोंदींचे दोन प्रकार आहेत. लोकसंख्याशास्त्रीयदृष्ट्या समान नोंदी आणि छायाचित्रणदृष्ट्या समान नोंदी. सॉफ्टवेअर अशा नोंदींची एक यादी तयार करते ज्यामध्ये वैयक्तिक मतदारांची नावे, पत्ते आणि फोटो एकमेकांसारखे दिसतात. त्यानंतर ते तपासले जातात, मतदारांच्या माहितीची पुन्हा तापसणी केली जाते आणि दुबार नावे हटविली जातात. तो मतदार यादी शुद्धीकरणाचा भाग असतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-08-2022 at 18:23 IST
Next Story
उत्तर प्रदेशात काका-पुतणा वाद! ‘कंस’, ‘श्रीकृष्ण’, ‘यदुवंशा’चे दाखले देत शिवपाल यादवांनी लिहिले खुले पत्र