त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीसह काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्ष जोरदार प्रचार करू लागले आहे. पश्चिम बंगालमधला सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस देखील त्रिपुरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. टीएमसीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्रिपुरात दाखल झाल्या आहेत. बॅनर्जी यांनी मंगळवारी एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांचा पक्ष (तृणमूल काँग्रेस) हा देशातला एकमेव पक्ष आहे जो भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारला सत्तेतून बाहेर काढू शकतो. देशातल्या नागरिकांना भाजपाऐवजी उत्तम पर्याय देऊ शकतो.

त्रिपुरातल्या जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, भाजपाच्या काळात त्रिपुरामध्ये लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. राज्यात पक्षांच्या राजकीय बैठकांना परवानगी नाकारली जात आहे. पत्रकारांनी बातम्या गोळा करण्याचा अधिकार गमावला आहे.

बेरोजगारी ४० टक्क्यांनी वाढली

ममता यांनी सवाल केला आहे की, डबल इंजिनवालं सरकार असताना देशात बेरोजगारी ४० टक्क्यांनी वाढली आहे. भाजपाने दिलेली आश्वासनं पूर्ण केली का? तुमच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आले का? ममता म्हणाल्या की, जो पक्ष लोकांना १०० दिवस काम (रोजगार) देऊ शकत नाही त्या पक्षाला लोकांची मतं मागण्याचा अधिकार नाही.

हे ही वाचा >> “नॅशनल हेराल्ड प्रकरणी जामीनावर असणाऱ्यांनी…”; राहुल गांधींच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर

ममता म्हणाल्या की, २ वर्षांपूर्वी आमच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला गेला. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबण्यात आलं. येथे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only tmc can provide alternative to bjp mamata banerjee promises bengal growth model in tripura asc