scorecardresearch

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्रमुख आहेत. याआधी त्यांनी सलग दोन वेळा म्हणजेच दहा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. २०११ सालापासून पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी १९९८ साली तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी पदं भूषवेलेली असून त्या देशाच्या रेल्वेमंत्री राहिलेल्या आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला १९७० साली सुरुवात झाली. १९७६ ते १९८० या काळात त्या पश्चिम बंगाल महिला काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. १९८४ साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

१९८४ साली त्यांच्याकडे भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९१-१९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सराकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास या विभागाच्या राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. काँग्रेस पक्षाशी वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी १९९९ साली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्रिपद भूषवले.
Read More
Home Minister Amit Shah claims that no one can stop the Citizenship Amendment Act
नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणीही थांबवू शकत नाही; गृहमंत्री अमित शहा यांचा दावा

‘‘केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणारच आहे. त्याच्या अंमलबजावणीपासून सरकारला कोणीही थांबवू शकत नाही,’’ असे केंद्रीय गृहमंत्री आणि…

Amit SHah
“CAA लागू करणारच, आम्हाला कोणीच…”, अमित शाहांचं मोठं वक्तव्य; ममता बॅनर्जींना आव्हान देत म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आसामच्या जनतेने तिथे भाजपाचं सरकार आणलं आता त्यांच्या सीमेवरून चिटपाखरूसुद्धा इकडे (भारतात) फिरकू शकत नाही.

mamata banarjee
“तुम्ही आमच्या चार नेत्यांना अटक केली, तर आम्ही…”, ममता बॅनर्जींचा भाजपाला थेट इशारा

“भविष्यात तुमच्याकडे सत्ता नसल्यावर तुरूंगात असाल”, असेही ममता बॅनर्जींनी म्हटलं.

mahua moitra and mamata banerjee
‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात महुआ मोईत्रांची ममता बॅनर्जींकडून पाठराखण; म्हणाल्या, “आगामी निवडणुकीत…”

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (२३ नोव्हेंबर) महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य केले.

mamata banerjee and sourav ganguly
सौरव गांगुली पश्चिम बंगालचे सदिच्छादूत, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा निर्णय?

पश्चिम बंगालच्या २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत गांगुली हे भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचे म्हटले जात होते.

Sourav Ganguly in World Bengal Business Conference
West Bengal: ममता बॅनर्जींची मोठी घोषणा! आता सौरव गांगुली बंगालचा नवा ब्रँड ॲम्बेसेडर

World Bengal Business Conference : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला बंगालचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले. यापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार…

mahua moitra
‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात महुआ मोईत्रांची तृणमूलकडून पाठराखण? लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा तिकीट मिळणार?

तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांना कृष्णानगर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद दिले आहे.

naushad siddiqui will contest general election against tmc leader abhishek banerjee
अभिषेक बॅनर्जींना नौशाद सिद्दीकींचे आव्हान; ममता बॅनर्जींच्या भाच्यासाठी लोकसभेची निवडणूक खडतर?

नौशाद सिद्दीकी हे आयएसएफ या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. या पक्षाने २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच डाव्या पक्षांशी युती…

sitaram yechury
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत बिघाडी? सीपीआय (एम) पक्ष तृणमूलशी युती करणार नाही?

शुक्रवारी (३ नोव्हेंबर) सीताराम येच्युरी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेस तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

tata motors, compensation, nano car project, singur, west bengal government, WBIDC
रद्दबातल सिंगूर नॅनो प्रकल्प : टाटा मोटर्सला पश्चिम बंगाल सरकारकडून ७६६ कोटींची भरपाई

तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाने प्रकल्पासाठी जबरदस्तीने शेतजमीन ताब्यात घेतल्याचा आरोप केल्यानंतर, टाटा मोटर्सने २००८ मध्ये…

Mumbai court dismisses complaint against Mamata Banerjee
ममता बॅनर्जी यांना दिलासा; राष्ट्रगीत अवमान प्रकरणी दाखल तक्रार न्यायालयाने फेटाळली, कोणताही गुन्हा घडलेला नसल्याचेही निरीक्षण

माझगाव येथील न्यायदंडाधिकारी एस. बी. काळे मोकाशी यांनी सोमवारी या प्रकरणी निर्णय देताना ममता यांच्याविरोधात गुप्ता यांनी केलेली तक्रार फेटाळली.

jyotipriya Mallick mamata banerjee
ईडीने बंगालचे मंत्री ज्योतीप्रिया मलिक यांना अटक का केले? नेमका आरोप काय?

ज्योतीप्रिया मलिक २०१६-२०२१ या काळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. मात्र, रेशनिंग घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्याकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×