पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये भाकरी फिरविण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन बळ दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या विठ्ठल कारखान्यावर भालके यांची सत्ता होती. ती मोडीत काढत तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी सत्तांतर केले. हा कारखाना दोन वर्षे बंद होता. तो सुरू करून ७ लाखांपेक्षा अधिक उसाचे गाळप आभिजित पाटील यांनी करून दाखवले. हा कारखाना उभारणीसाठी पाटील यांनी शरद पवार, भाजपाचे प्रवीण दरेकर यांची मदत घेतली. त्यामुळे साहजिकच पाटील यांच्याकडे मोठ्या पक्षातील नेत्यांचा पाहण्याचा दुष्टीकोन बदलला. पवारांनी कार्यक्रमात अभिजित पाटलांचा पक्ष प्रवेश केला. विशेष म्हणजे, दिवंगत आ. भारत भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके तर वसंतराव साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे या राष्ट्रवादीच्याच तरुण कार्यकर्त्यांना डावलून पवारांनी पाटील याना पक्षात घेतले.

हेही वाचा – बुलढाणा : ट्रॅव्हल बस पुलावरून कोसळली; महिला ठार, २० प्रवासी जखमी

पंढरपूर तालुक्यात दिवंगत माजी आ. सुधाकरपंत परिचारक, दिवंगत आ. भारत भालके यांचे वर्चस्व होते. परिचारकानी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी जवळीक केली. आणि प्रशांत परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य झाले होते. तर परीचारकाना थेट लढत देत स्व. भारत भालके दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते. मात्र त्या दोघांच्या निधनानंतर पंढरपूर तालुक्यात परिचारकाना विरोधक राहिला नाही असे चित्र होते. अशा राजकीय परिस्थितीत अभिजित पाटलांना राष्ट्रवादीत आणून भाजपाचे माजी आ. परिचारक, आ. आवताडे यांच्या बरोबरीने पक्षातील भालके, काळे यांना पवारांनी धक्का दिला. तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघातील काही गावे पंढरपूर तालुक्यात येत आहेत. त्यातील काही गावात श्री विठ्ठल कारखान्याचे सभासद आहेत. तर माढ्याचे विद्यमान जेष्ठ नेते आ. बबनदादा शिंदे हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांनासुद्धा एक प्रकारे सूचक इशारा पवारांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा सध्या भाजपाकडे आहे. तो पुन्हा काबीज करण्यासाठी पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी कशी केली जाईल हेसुद्धा आवाहन राष्ट्रवादी पुढे असणार आहे.

हेही वाचा – वाशीम : जिल्ह्यात सर्वाधिक काळ ठाण मांडून बसलेले निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांची अखेर जिल्ह्याबाहेर बदली!

सोलापूर जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते. जिल्ह्यात मोहिते पाटील, परिचारक, बागल, सोपल, राजन पाटील अशी मात्तबर नेते होते. त्यानंतर दुसऱ्या फळीत आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, संजय शिंदे, रश्मी बागल हे तयार झाले, मात्र त्यातील अनेकजणांनी भाजपाची वाट पत्करली तर मोजकेच राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे पुन्हा पक्ष बांधणी करताना जुन्यांना अलगत बाजूला करत असताना नव्या उमेदीचे आणि बेरजेचे राजकारण करीत पवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शरद पवारांनी जिल्हाच्या दौऱ्यात तरुणाना संधी दिल्याने सोलापुरातील राष्ट्रवादीचे महेश कोठे, तौफिक शेख बार्शीचे विश्वास बारबोले, निरंजन भूमकर अशा काही तिसऱ्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar has admitted president of vitthal cooperative sugar factory abhijit patil in ncp in pandharpur print politics news ssb