पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा मुख्य सत्ताधारी पक्ष आहे. निवडणुकांच्या वेळी भाजपासोबत ममता यांचा मोठा संघर्ष झाला होता. अनेकवेळा या सत्तासंघर्षाला हिंसक वळण लागले होते. अखेर त्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी बाजी मारली होती. मात्र आता ममता यांच्या पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीबीआयचे समन्स

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे वजनदार नेते अनुब्रता मोंडल हे सीबीआयच्या रडारवर आहेत. तृणमूल कॉंग्रेसचे बीरभूम जिल्ह्याचे प्रमुख अनुब्रता मोंडल हे सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर झाले. पश्चिम बंगालमधील गुरांच्या तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी अनुब्रता मोंडल यांना अनेकवेळा सीबीआयने समन्स पाठवले होते. पण यापूर्वी प्रत्येक समन्सनंतर त्यांनी चौकशीला सामोरं जाणं टाळलं होतं. एकही दिवस ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. अखेर ते सीबीयासमोर चौकशीसाठी हजर झाले. 

कोण आहेत अनुब्रता मोंडल ?

६२ वर्षीय मोंडल हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना केली त्यामध्येसुद्धा मोंडल यांना महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. या समितीत असलेले ते एकमेव राज्यस्तरीय नेते आहेत. या समितीमध्ये मोंडल यांच्यासह पक्षाचे २० दिग्गज नेते आहेत. गेली २ दशके ते ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून काम करत आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. आतपर्यंत ते एकही निवडणूक लढले नाहीत. मात्र मोंडल हे त्यांच्या बूथ व्यवस्थापन कौशल्यासाठी ओळखले जातात. निवडणुकीच्या काळात प्रक्षोभक भाषणे करून आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले होते.

अनुब्रता मोंडल आणि वाद

संघटन कौशल्यासोबतच एक वादग्रस्त ताकदवान नेता अशी त्यांची ख्याती आणि दहशत आहे. लोकांना धमकावणे, खून, वाळू तस्करी, दगड आणि गुरांची तस्करी अश्या गुन्ह्यांचे त्यांच्यावर आरोप झाले आहेत. अलीकडेच राज्यपाल जगदीप धनकर यांनी मोंडल यांना मंत्रीपद नसताना देखील लाल दिवा असलेले वाहन वापरण्याची परवानगी दिल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर घडलेल्या बोगटुई हत्याकांडातही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. असे असूनही मोंडल यांचा प्रभाव आजुनही दिसून येतो. पश्चिम बंगालमध्ये गुरांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. मोंडल यांच्यावर गुरांच्या तस्करीचा आरोप ठेवण्यात आला आहे.या प्रकरणातच सीबीआयने मोंडल यांची चौकशी केली. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong man of tmc and very close person to mamta banerjee anubrata mondal is under scanner of cbii pkd