पुणे : रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. पुणे विभागातील तिकीट तपासणी पथकांनी सप्टेंबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १७ हजार ६२२ प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वेकडून सातत्याने तिकीट तपासणीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सप्टेंबरमध्ये १७ हजार ६२२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांना १ कोटी ४२ लाख १७ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच, अनियमित प्रवास करणारे ९ हजार ३६४ जण सापडले. त्यांच्याकडून ५५ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याचबरोबर सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १५६ जणांकडून २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>सासरच्या छळामुळे उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांचे नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.