पुणे : सासरच्या छळामुळे उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून पती, सासू, सासरे, तसेच नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्पिता अभिषेक घाणेकर (वय ३२, रा. मंगलमूर्ती काॅम्प्लेक्स, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अर्पिताचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अभिषेक विजय घाणेकर (वय ३५), सासरे विजय (वय ६४), सासू मधुरा (वय ६२), तसेच नणंद कश्मिरा रामनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पुणे : रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत अर्पिताचे वडील कमलेश राजीवकुमार पालीवाल (वय ६०, नोएडा, गौतम बुद्धनगर, उत्तरप्रदेश) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्पिता आणि पती अभिषेक उच्चशिक्षित आहेत. २०२१ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेजण काही काळ जर्मनी, नोएडात राहायला होते. त्यानंतर दोघेजण पुण्यात आले. अर्पिताचा पती, सासू, सासरे, नणंदेकडून छळ करण्यात आला. छळ असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली, असे अर्पिताचे वडील विजय यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.