विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चेतन मारुती घाडगे (वय २९, रा. ओैंध) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी घाडगे ओळखीचे आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी : पाच कोटी ८४ लाखांची फसवणूक ; निगडीत महिलेसह सात जणांवर गुन्हा
घाडगे याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर तरुणीला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.