पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; ३५ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

तिला धमकावून एका रूग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. त्याने रूग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली.

rape Case Pune
त्या मुलीला गर्भपात करण्यासही भाग पाडलं (प्रातिनिधिक फोटो)

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल वसंत गायकवाड (वय ३५, रा. इराणी मार्केट, येरवडा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गायकवाड आणि तरुणीची ओळख आहे. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाल्याचे समजल्यानंतर गायकवाडने तिला धमकावले. तिला धमकावून एका रूग्णालयात गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. गायकवाडने रूग्णालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली.

गायकवाडने वैद्यकीय कागदपत्रे फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 35 year man rape a girl by a false promise to marry pune print news scsg

Next Story
11th Admission: अकरावीचे प्रवेश अर्जांसंदर्भातील सुधारित वेळापत्रक जारी; ‘या’ सहा शहरांत सुरु होणार प्रक्रिया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी