पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री समोर आली. लक्ष्मण देवासी असं हत्या झालेल्या आठ वर्षीय मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह घराच्या शंभर मीटर अंतरावर सापडला आहे. या प्रकरणी एका संशयिताला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी हा आठ वर्षीय मुलगा रविवारी दुपारपासून बेपत्ता झाला. त्याचा आई वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर चिखली पोलीस ठाणे गाठून रात्री सातच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तेव्हा, त्याच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह आढळला. त्याचा अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा गट्टू घालून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.

मयत लक्ष्मणच्या वडिलांचं किराणामालाचं दुकान आहे. त्यामुळं ही हत्या कोणी आणि का केली याचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 year boy killed in pune kjp scsg