PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी | A case of treason should be filed against the workers of PFI organization demands of BJP to Pune Police Commissioner svk 88 | Loksatta

PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली.

PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी
PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली. त्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ आज पुण्यातील अलका टॉकीज मनसेचे नेते अजय शिंदे आणि युवा सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी नेतृत्वाखाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.तर पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आला.या सर्व घडामोडी दरम्यान भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधीनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन, पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई अशी मागणी केली.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की,पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना ज्यांनी घोषणा दिल्या.त्या सर्वांना अटक करून देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा.तसेच यापुढे कोणाचाही हिम्मत अशा प्रकारची होता कामा नये.अशा स्वरूपाची आम्ही पोलिस आयुक्तांकडे केल्याच त्यांनी सांगितले.

संबधित व्हिडिओ लॅबमध्ये तपासणी करीता पाठवला
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.मात्र तो व्हिडिओ आम्ही लॅबमध्ये तपासणी करीता पाठवला आहे. आता त्याचा अहवाल आल्यानंतर आंदोलनकर्त्यांवर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याच पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली.

पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी.या मागणीचे निवेदन देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे अडीच वाजता येणार होते. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिस कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.आता यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार का यावर पोलिसांनी उत्तर देण टाळल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : बारामती आम्हीही जिंकू शकतो , रामदास आठवले यांचा विश्वास

संबंधित बातम्या

‘राज्यपाल हटाव’च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक, अजित पवार म्हणाले, “कोश्यारी खासगीत म्हणतात…”
महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अजित पवार म्हणाले, “ओठात एक आणि…”
जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश
शाब्बास गुरुजी! पालिकेच्या शाळेत अभिनव उपक्रम, टाकाऊ वस्तूंपासून बनवलं रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र!
मुख्यमंत्री फडणवीस नुसतीच स्वप्ने दाखवतात, अजित पवारांची टीका

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न
विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटल्याचा VIDEO व्हायरल; प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई
‘फुलाला…’ मालिकेचा सुगंध सदैव दरवळत राहणार; लोकाग्रहास्तव वाहिनीचा मोठा निर्णय
जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा…
३० नोव्हेंबरला प्रतापगडावर शिवप्रतापदिनाचे आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रमुख उपस्थिती