काकाच्या भरवशावर सोडून परगावी गेलेल्या दाम्पत्याच्या दोन अल्पवयीन मुलींवर काका आणि त्याच्या मित्राने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार २९ वर्षीय काका आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…म्हणून आम्ही दोघे एकत्र आलो आहोत”, उद्धव ठाकरेंनी सांगितलं प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचं कारण

हेही वाचा – मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे प्लास्टर पडून आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

तक्रारदार महिलेच्या घराशेजारी दाम्पत्य राहायला आहे. त्यांना १४ आणि १० वर्षांच्या दोन मुली आहेत. दाम्पत्य कामानिमित्त दिल्लीला गेले. त्यामुळे दाम्पत्याने दोन्ही मुलींना काकाकडे सोडले. काका आणि त्याच्या मित्राने मुलींवर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलींनी या प्रकाराची माहिती शेजारी राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेला दिली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abuse of two minor girls by their uncle in pune pune print news rbk 25 ssb