हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानव्ये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्यांच्या आदेशानंतर गुंडाला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. आतापर्यंत शहरातील ८८ गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. राकेश शंकर ठोकळ (वय २१, रा. खजुरे वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘पुणे ग्रामीण भागातील पीएमपीची सेवा पूवर्वत करा’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

ठोकळ याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्ज्ञ बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वेय कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाणयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तयार केला होता. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. शहरात गुंडगिरी करणाऱ्या गुंडांच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील ८८ गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against gangsters who are terrorizing hadapsar area pune print news rbk25 dpj