पिंपरी- चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी- चिंचवड दौरा अचानक रद्द झाला आहे. आज पिंपरी- चिंचवड शहरातील ३५ पेक्षा अधिक गणपती मंडळांच दर्शन घेऊन आरती करणार होते. परंतु, काही कारणामुळे त्याचा हा दौरा रद्द झाला आहे. ते थेट मुंबई ला रवाना झाले आहेत. दुपारी साडेबारा वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत दौरा होता. दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
आगामी महानगर पालिका निवडणुका डोळ्या समोर ठेऊन अजित पवारांनी पिंपरी- चिंचवड शहराचा आज दौरा करणार होते. शहरातील ३५ पेक्षा अधिक गणेश मंडळांना धावती भेट देणार होते. दुपारी साडेबारा पासून सुरू होणारा दौरा रात्री दहा पर्यंत चालणार होता. अजित पवारांना पुन्हा एकदा आपली पकड असलेला बालेकिल्ला मिळवायचा असल्याने अतोनात प्रयत्न करत आहेत. शहरात पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी ही लक्ष घातलेल आहे.
शहरात अजित पवारांचा दौरा असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळ नऊ पासून शहरात मोठा बंदोबस्त होता. परंतु, दुपारी पाऊने दोन वाजता अजित पवारांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. अशी माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे. दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये हिरमोड झाला आहे.