भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज औंध जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. जगताप यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांना अश्विनी जगताप यांनी तंबी देत धारेवर धरले. अश्विनी या नुकतेच झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार अश्विनी जगताप यांनी पहिल्याच दिवशी त्यांच्या कार्यालयात जाऊन कामकाजाची सुरुवात केली होती. आता थेट त्यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिल्याने रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. जगताप यांनी आयसीयूमध्ये जाऊन पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली. मग, औषध वाटपाच्या ठिकाणी जाऊन रुग्णांचे नातेवाई, रुग्णांच्या तक्रारी जाणून घेत थेट तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हेही वाचा – कसब्यात भाजपाचा पराभव का झाला? बापट-टिळकांचा उल्लेख करत शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

हेही वाचा – ‘पीएमपीएमएल’च्या प्रश्नासाठी रवींद्र धंगेकर आणि भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक एकत्र

“रुग्णालयातून नागरिक परत गेले नाही पाहिजेत, अन्यथा तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईल. मी पुन्हा रुग्णालयाला भेट देईल,” असा सज्जड दम आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. हे सर्व पाहता अश्विनी लक्ष्मण जगताप या अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwini jagtap visit aundh district hospital in pune heard complaints of the patients warn officers kjp 91 ssb