पुणे : सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून तस्करी करण्याचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना कस्टमच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून ३३ लाख ३३ हजार रुपयांची ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना विशेष अतिथी दर्जा; पुणे दौऱ्यानिमित्त मंत्रालयातून आदेश

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेले दोन प्रवासी घाईघाईने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचाली टिपल्या. दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघांनी गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले. कॅप्सुलमधील ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३३ लाख ३३ हजार असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At pune international airport woman hid gold worth rupees 33 lakhs in her genitals pune print news rbk 25 css