अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात घडली.या प्रकरणी अक्षय राजू चव्हाण (वय २४, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>बोगस डाॅक्टरच्या उपचारामुळे गरोदर महिलेचा मृत्यू

अल्पवयीन मुलीचा आरोपी चव्हाण पाठलाग करत होता.त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. फिरायला जाऊ असे सांगून त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने ॲसिड सदृश ज्वलनशील द्रवपदार्थ फेकून तिला मारण्याचा प्रयत्न केला, असे अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempted to throw acid on a minor girl for resisting violence pune print news rbk 25 amy