पिंपरी- चिंचवड: गुन्हे शाखा युनिट चार ने बाबा शेख गॅंग चा टोळी प्रमुख आणि नंबरकारी यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. बाबा सैपन शेख आणि आशिष अनिल कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार बाबा सैपन शेख हा कोविड काळात येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आहे. परंतु, अद्याप ही कालावधी संपून देखील येरवडा कारागृहात हजर झालेला नाही. याबात येरवडा कारागृहाच्या कळवण्यात आलं आहे. दोन्ही सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट चार ने औंध रुग्णालय परिसरातून अटक केली आहे.

सराईत गुन्हेगार आणि बाबा शेख टोळीचा प्रमुख आहे. त्याचा साथीदार आणि नबंरकारी साथीदार आशिष कांबळे याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघांकडून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. बाबा शेख याच्यावर विविध १५ गुन्हे दाखल आहेत. आशिष कांबळे यांच्यावर ही दोन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने केली आहे.