पुढील आठवड्यात देशभरातील बँका दोन अथवा तीन दिवस बंद राहणार आहेत. प्रत्येक राज्यात होळीसाठी वेगवेगळ्या सुट्या असल्यामुळे बँका बंद राहण्याचा कालावधीही वेगळा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘कॅशबॅक’च्या लाभपोटी पावणेदोन लाख गमावले

होळीमुळे काही राज्यांत सलग दोन दिवस सुट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्यांच्या वेळापत्रकानुसार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत ७ व ८ मार्चला सलग दोन दिवस बँका बंद राहतील. बिहारमध्ये बँका ८ व ९ मार्चला सलग दोन दिवस बंद राहतील. याचबरोबर पुढील आठवड्यातील शनिवार हा महिन्यातील दुसरा असल्याने या दिवशीही बँका बंद असणार आहेत.

हेही वाचा- बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

होळी ७ मार्चला असून, त्यादिवशी महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगण, झारखंडमधील बँका बंद राहतील. धुळवड ८ मार्चला असून, त्यादिवशी त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, मध्य प्रदेश, ओडिशा, चंडीगड, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, बिहार, छत्तीसगड, मेघालय, हिमाचल प्रदेशमधील बँका बंद राहतील. बिहारमधील बँका होळीच्या निमित्ताने ९ मार्चलाही बंद राहणार आहेत. महिन्यातील दुसरा शनिवार ११ मार्चला असल्याने त्यादिवशीही बँका बंद असतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks are closed for three days next week pune print news stj 05 dpj