शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यासाठी जून अखेरपर्यत सीईटी, विद्यापीठांच्या परीक्षा, चंद्रकांत पाटील यांची माहिती

शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना कोणतीही अडचण येणार नाही, असे पाटील यांनी सांगितले

chandrakant patil
चंद्रकांत पाटील ( Image – लोकसत्ता टीम )

पुणे : राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांचे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जून अखेरपर्यत सीईटी आणि विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात एका कार्यक्रमावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>> सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळेच कोंडी सुटेल, पुण्यातील कोंडीबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजित गाडगीळ यांचे मत

पाटील म्हणाले की, करोनामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार सीईटी परीक्षा जूनपर्यत घेऊन, त्यांचा निकालही तत्काळ जाहीर करण्याच्या सूचना सीईटी सेलला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठांना त्यांच्या परीक्षा जून महिन्याच्या अखेरपर्यत पूर्ण करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे १ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना कोणतीही अडचण येणार नाही, असे पाटील यांनी सांगितले

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 22:32 IST
Next Story
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळेच कोंडी सुटेल, पुण्यातील कोंडीबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजित गाडगीळ यांचे मत
Exit mobile version