पुणे : अवे‌ळी पावसाचा मध्यप्रदेशामध्ये, तर अधिक पावसाचा कर्नाटकमध्ये फटका बसल्याने यंदा मिरचीच्या दरामध्ये गेल्या ५० वर्षांतील उच्चांकी भाववाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा मिरचीचे उच्चांकी भाव झाले आहेत. मिरचीचे उत्पादन आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा या प्रांतामध्ये होते. मिरची पिकाकरिता पूरक पाऊस आणि वातावरण मिळणे आवश्यक असते. सर्वप्रथम मध्यप्रदेशमध्ये मिरचीचे पीक निघते. मध्यप्रदेशमध्ये अवेळी पावसामुळे पिकावर परिणाम झाला. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये पीक नगण्य आले. कर्नाटकमध्ये जास्त पाऊस झाल्याने तेथेही पिकास फटका बसला. त्यामुळे कर्नाटकमध्येही पीक कमी आले आहे, अशी माहिती मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.

हेही वाचा – पुणे: वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक उद्यापासून बंद ; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये रोज सुमारे दोन ते सव्वादोन लाख पोते, तर कर्नाटकमध्ये आठवड्याभरात दोन ते सव्वादोन लाख पोते मिरचीची आवक होते. माल त्वरित विकला जातो. सध्या बांग्लादेश, मलेशिया, इंडोनेशिया, चीन, दुबई आणि इतर देशांत मिरचीची निर्यात होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मिरचीचे दर

मिरची ढब्बी (कॅशमिरी) : ६०००-७०००
कांडी नं १ : ५८८-६६००,
कांडी नं २ : ५२००-५७००
खुडवा : १३००-१५००,
मिरची गंदुर : २५००-२७५०,
तेजा : २२५०-२५००,
गंदुर नं २ : २२५०-२५००,  
गंदुर खुडवा : १५००-१८००

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : “राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महानगरपालिकेतील कारभार”, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा आरोप

आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात शीतगृहांमध्ये मालाची साठवण करतात. यावर्षी शीतगृहांमध्ये असलेला जुना माल संपुष्टात आला आहे. उत्पादन क्षेत्रात मसाला कारखानदार आणि निर्यातदारांची मागणी वाढली आहे, त्यामुळे भाववाढ झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या ५० वर्षांत मिरचीचे भाव एवढे कधीच झालेले नाहीत, असे मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chili prices rise to highest in 50 years pune print news vvk 10 ssb