पुणे : कंटेनरची धडकेने अपघात ; दुचाकीस्वार तरुण ठार

कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण ठार झाला. कुंजीरवाडी परिसरात बुधवारी (१० ऑगस्ट) हा अपघात झाला.

पुणे : कंटेनरची धडकेने अपघात ; दुचाकीस्वार तरुण ठार
( संग्रहित छायचित्र )

कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण ठार झाला. कुंजीरवाडी परिसरात बुधवारी (१० ऑगस्ट) हा अपघात झाला.राजू महादेव लंगुटे (वय २८ रा. पिराचा मळा, उरळीकांचन ) असे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या  तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन मोगल (वय ३२, रा. पिराचा मळा) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

नितीन यांचा मावसभाऊ राजू लंगुटे १० ऑगस्ट रोजी उरळीकांचन परिसरातून दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी भरधाव येणाऱ्या कंटेनरचालकाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात राजू गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : मोटारीतून पैसे पडल्याची बतावणी ; ८३ हजारांचा ऐवज लंपास 
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी