पुणे : व्यावसायिकाच्या गळ्याला हत्यार लावून त्यांच्याकडे व्याजाची मागणी करणाऱ्या सावकाराला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेरू परदेशी, अथर्व देशपांडे, धीरज वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर किशोर मालू (रा. बोपोडी) यांनी तक्रार दिली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांनी संशयित आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यांनी काही व्याज देखील दिले होते. पण, तरीही त्यांच्या गळ्याला घातक शस्त्रे लावून त्यांच्याकडे व्याजाची मागणी करण्यात येत होती. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक तसेच पथकातील राजेंद्र लांडगे, प्रफुल चव्हाण हे करत होते.

तक्रारदारांचा जबाब तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांना धमकावण्यात येत असल्याचे समोर आले. त्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेरू परदेशी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cops arrest moneylender for demanding interest money pune print news zws