पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध १२०० जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करून तो पाडण्यात येणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरविण्यात आली. त्यानंतर चार ते पाच हजार जण या परिसरात जमले. समाजमाध्यमातून अफवा पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. समाजमाध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध एक हजार ते १२०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – पुढील तीन वर्षात पुण्याला नवे विमानतळ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

हेही वाचा – अजितदादांच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्यासाठी भाजप आमदाराचे परमेश्वराला साकडे

दरम्यान, मध्यभागातील कसबा पेठेत तणाव निर्माण झाल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मंदिरे, तसेच प्रार्थनास्थळांच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.