कोयत्याने रिक्षा चालकावर केले होते वार

पिंपरी– चिंचवडच्या चाकण पोलिसांनी दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराची धिंड काढून चांगलीच अद्दल घडवली आहे. रजित येरकर अस हा सराईत गुन्हेगाराच नाव आहे. बाजारपेठेत नागरिकांच्या समोर गुन्हेगार रजित येरकर ला पोलिसांनी उठाबशा करायला लावतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या कृतीच कौतुक होत आहे.

रजित आणि इतर दोन अल्पवयीन मुलांनी चाकणमध्ये रिक्षा चालकाला कट मारण्यावरून वाद झाले होते. रिक्षाचा मोबाईलमध्ये फोटो काढून रिक्षा चालकाला धमकावले होते. रजित येरकर आणि अल्पवयीन दोन मित्रांसह रिक्षा चालक आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने वार केले होते. लाठ्या- काठ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी चाकण पोलिसांनी यरेकर आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. पैकी, रजित येरकर याची चाकण बाजारपेठेतून धिंड काढत अद्दल घडवली आहे.

रजित येरकर हा स्वतः ला चाकणमधील भाई समजत होता. हात आणि दंडाला दोरखंड बांधून त्याची पोलिसांनी धिंड काढली आहे. भर चौकात उठाबशा काढायला लावल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे. चाकणमधील तथाकथित या भाईची मुजोरी चाकण पोलिसांनी मोडून काढली आहे. पिंपरी- चिंचवडच्या चाकण पोलिसांच कौतुक होत आहे.