पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार निवृत्त कर्नल आहेत. समाजमाध्यमातून चोरट्यांनी त्यांना एक संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफितींना दर्शकपसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.
सुरुवातील चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा केले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला. त्यांना ऑनलाइन टास्क योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या १८ बँक खात्यात वेळोवेळी दोन कोटी रुपये जमा केले. लष्करी अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तसेच साठवलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात ४१ व्यवहारांद्वारे जमा केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber thieves continue to cheat online tasks pune print news rbk 25 ysh