पुणे: गुंठेवारीतील घरे आणि अन्य बांधकामे नियमित करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यानुसार येत्या ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना घरे नियमित करण्यासाठी अर्ज करता येणार आहेत.

पीएमआरडीएच्या हद्दीतील गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेड झोन, बफर झोन, हिल टाॅप, हिल स्लोप, शेती तथा ना विकास झोन, वनीकरण क्षेत्र, शासकीय-खासगी वने, प्रादेशिक योजनेबरोबरच प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणे, नदीपात्र आणि सरकारी जागांवर झालेली बांधकामे नियमित होणार नाहीत, असे पीएमआरडीएकडून कळविण्यात आले आहे.