भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे: ‘ॲकॅडमिक क्रेडिट बँक’साठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांची माहिती

खासदार गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव बापट यांचा सक्रिय राजकारणातील सहभागही कमी झाला आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने टिळक कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेते पुण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी खासगी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बापट यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. ते लवकर बरे होतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis inquired about mp girish bapats health pune print news apk 13 dpj