लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: दहशतवादी कृत्यासाठी पुण्यातील शाळेचा वापर केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईतून समोर आल्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित शाळेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेकडून कोंढवा येथील शाळेचे दोन मजले मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा ठपका एआयएने ठेवला. तसेच शाळेवर टाच आणण्यात आली आहे.

आणखी वाचा- काही झाले की माझ्या भावावर खापर फोडले जाते: सुप्रिया सुळे

या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे म्हणाले, की संबंधित शाळेची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि महापालिका शिक्षण विभागातील अधिकारी शाळेत जाऊन चौकशी करत आहेत. सायंकाळपर्यंत या संदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यातून अन्य तपशील समोर येतील.