पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोरमधील भाटघर धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या वडील आणि शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले वडील आणि मुलगी पुण्यातील औंध परिसरात वास्तव्यास होते. शिरीष मोहन धर्माधिकारी (वय ४५) आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या (वय १३, दोघे रा. औंध) अशी मृत्युमुखी  पडलेल्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंची निवड रखडली

भाटघर धरण परिसरातील जयतपाड गावाजवळ असलेल्या सीमा फार्म हाऊस येथे भूषण फालक आणि शिरीष धर्माधिकारी कुटुंबीयांसोबत फिरायला गेले होते. सीमा फार्म हाऊस धरणाच्या काठावर आहे. मंगळवारी (१५ ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास शिरीष आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या पाण्यात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. दोघेजण बुडल्याचे लक्षात आल्यानंतर फार्म हाऊसमधील कामगारांना या घटनेची माहिती देण्यात आली. कामगारांनी पाण्यात बुडालेल्या ऐश्वर्याला बाहेर काढले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father daughter duo drown in backwaters of bhatghar dam pune print news rbk 25 zws