पुणे : कल्याणीनगरमधील मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी उंची शिडीचा वापर करुन अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आयटी पार्कच्या इमारतीच्या गच्चीवर असलेल्या चौघांची सुटका केली. मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. जवानांनी घटनास्थळी घाव घेतली. मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीतील आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी उंच यांत्रिक शिडीचा वापर केला. आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची जवानांनी सुटका केली. इमारतीच्या गच्चीवर चौघेै जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी उंच शिडीचा वापर करुन त्यांना सुखरुप खाली आणले. तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर आयटी पार्क परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2023 रोजी प्रकाशित
कल्याणीनगरमधील मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत आग
कल्याणीनगरमधील मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी उंची शिडीचा वापर करुन अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-05-2023 at 16:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at marigold it park building in kalyaninagar pune print news rbk 25 ysh