पुणे : वानवडी भागात महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. वानवडीतील आझादनगर परिसरात रुबी हाॅल क्लिनीकजवळ असलेल्या महावितरणच्या रोहित्राने दुपारी अडीचच्या सुमारास पेट घेतला. आग भडकल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिवसेना ठाकरे गटाच्या पिंपरी महिला संघटिकेसह ८ जणांची हकालपट्टी

अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रशांत गायकर, कैलास पायगुडे,  दाभाडे आणि सहकारी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at rohitra of mahavitaran in wanwadi pune print news rbk 25 ysh