पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर नोकरीच्या आमिषाने चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी होते. निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मोबाइल वर्क इन इंडिया नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरीची संधी असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास सांगितले. तक्रारदाराकडे बतावणी करुन चोरट्यांनी वेळोवेळी दोन लाख ९८ हजार ७०० रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक ढवळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with the lure of getting a job at an international airport pune print news rbk 25 amy