पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी येथे घडली. ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजा वसंत राठोड (वय २५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील आहे. ती एका कंपनीत नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडगाव शेरीतील एका अभ्यासिकेत अभ्यास करीत असताना ती अचानक कोसळली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पूजाचे वित्रान शाखेतील पदवीचे शिक्षण सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात, तर पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झाले. कोंडी तांडा येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आकस्मिक मृत्यू अशी नोंद चंदननगर पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पालवे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl student preparing for mpsc in pune died of heart attack in study room pune print news zws