आपल्या भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे प्रेरणा देणारा कालखंड. यातील अनेक घडलेल्या घटना आपल्याल्या देशप्रेमाची आणि देशभक्तीची जाणीव करून देतात. अशीच एक ब्रिटीशांना धास्ती भरवणारी घटना घडली पुण्यात. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण भेट देणार आहोत त्या गणेश खिंडीतील जागेला ज्या ठिकाणी चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केला होता.