ग्लोबल वॅार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ ही जगाला भेडसावणारी मोठी समस्या आहे. वातावरणात होणारे बदल, कार्बन उत्सर्जन याविषयी अनेकदा देश आणि जागतिक पातळीवर चर्चा केली जाते. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी एक सामान्य व्यक्ती काय योगदान देऊ शकते? हाच विचार करून पुण्यातील प्राची शेवगांवकर हिने ‘कूल द ग्लोब’ (Coo The Globe) या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिचं हे अ‍ॅप ११० देशांमध्ये सध्या वापरलं जात आहे. या माध्यमातून गेल्या दोन वर्षात २५ लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे. या अ‍ॅपच्या मदतीने प्राची आणि जगभरातील काही सामान्य लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणाच्यादृष्टीने बदल घडवण्याचा निर्धार केला आहे.

‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक  करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi prachi shevgaonkar from pune has created the cool the globe app for climate change and global warming issues pck