लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची मुदत संपुष्टात आली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम यंदा स्वत:च्या अखत्यारित घेतले. आतापर्यंत या अभ्यासक्रमांचे प्रवेश बारावीतील गुणांच्या आधारे महाविद्यालयांच्या स्तरावर होत होते. मात्र हे अभ्यासक्रम एआयसीटीईच्या अखत्यारित गेल्यामुळे हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी मान्यता बंधनकारक झाली आहे, तसेच या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. त्याशिवाय या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांच्या स्तरावर न होता केंद्रीभूत पद्धतीने सीईटी सेलतर्फे राबवण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रवेश परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी आधी ३० एप्रिलपर्यंत आणि त्यानंतर ५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

आणखी वाचा-मतदानाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ५६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता या परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many students register for cet of bba bms bca pune print news ccp 14 mrj
First published on: 06-05-2024 at 22:54 IST