पिंपरी : रूग्णालयात अस्थमा आजारावर उपचार घेत असलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिका-याची गुंतवणुकीच्या बहाण्याने डॉक्टरनेच सव्वाकोटीची फसवणूक केल्याचा प्रकार थेरगावात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरचे थेरगावात रूग्णालय आहे. फिर्यादी यांना दम्याचा त्रास असल्याने डॉक्टरच्या रूग्णालयात उपचारासाठी गेले होते.
डॉक्टरने फिर्यादी यांना रूग्णालयामध्ये चांगला मोबदला व ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीकडून एक कोटी ३७ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर डॉक्टरने रूग्णालय बंद केले. रूग्णालयातील वैद्यकीय साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. फिर्यादी यांचे पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd