पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातून पाणी सोडले जात आहे. मात्र उद्या (गुरुवारी) १८ सप्टेंबरला अनेक भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. पाणीपुरवठा न होणाऱ्या भागांची यादी देखील महापालिकेने जाहीर केली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांची विद्युत विषयक व पंपिंग विषयक कामे केली जाणार आहेत. ही तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामांमुळे शुक्रवारी ( १९ सप्टेंबरला) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांची यादी पाणीपुरवठा विभागाने जाहीर केली आहे. यामध्ये पुढील भागांचा समावेश आहे.

वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.

पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेकटाउन, शिवतेजनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण लगतचा परिसर.

चांदणी चौक परिसर : भूगाव रस्ता परिसर, संपूर्ण बावधन, दोन्ही भुसारी कॉलनी व लगतचा भाग, गुरू गणेशनगर, सूरजनगर, संपूर्ण बावधन, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, संपूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहननगर, सूस रस्ता.

राजीव गांधी पंपिंग : सच्चाई माता टाकी, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगर (काही भाग) राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, कात्रज गावठाण, येवलेवाडी परिसर.

वारजे जलकेंद्र : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर.

गांधी भवन टाकी परिसर : काकडे सिटी, हिंगणे होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, हिल व्ह्यू गार्डन, पॉप्युलरनगर, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर,महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य परिसर, कुमार परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा, सहजानंद (भाग), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर कंपनी, लक्ष्मीनगर, बाह्यबळण रस्ता दोन्ही बाजू, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपतीनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधाम, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता.

एसएनडीटी परिसर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हाउसिंग सोसायटी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाइन, संगमवाडी.

वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी परिसर : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११. इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०, शिवणे औद्योगिक परिसर

जुने वारजे जलकेंद्र भाग : रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर, गोकुळनगर, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रस्त्याचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग : मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरी, हरीगंगा सोसायटी.

पाषाण पंपिंग व सूस गोल टाकी परिसर : गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्रनगरचा काही भाग, समर्थ कॉलनी.