पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभागाकडून कोरेगाव भीमामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ‘पीएमआरडीए’च्या पथकामार्फत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमामधील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील एकूण ५५ अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दुकाने, आरसीसीची पक्की बांधकामे, सीमाभिंत, तात्पुरते पत्राशेड, होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले.

दरम्यान, पीएमआरडीएकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यामुळे जवळपास शंभर अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली आहेत. कोरेगाव भीमा मधील ही कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम आणि निर्मूलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रवींद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता दीप्ती घुसे यांच्या पथकाने केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune pmrda anti encroachment drive illegal constructions demolished koregaon bhima pune print news apk 13 css