पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात पकडले. त्यांच्याकडून ३८ किलो गांजा जप्त करण्यात आला. सुमेर सादिक तांबोळी (वय २६), विकास बाळू बनसोडे (वय ३४, दोघे रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तांबाेळी आणि बनसोडे पुणे -सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून ३८ किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचा माल जप्त

पुणे शहरात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ३६७६ कोटी १४ लाख ९० हजार ४७० रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे पुणे हे अंमली पदार्थांचे आगार बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सात महिन्यांत केवळ पुणे शहरातून तब्बल ३६७६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: पत्नीने केली मोबाइलच्या हट्टापायी आत्महत्या; वाकड मधील घटना

जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी विरोधी धोरणात्मक बाबींमध्ये समन्वय राखणे, वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर आळा घालणे, अंमली
पदार्थांबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर (एनसीओआरडी) समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्राच्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अंमली पदार्थांच्या तस्करीच्या नवीन पद्धतीबाबत माहिती गुप्तचर संस्था, यंत्रणेमार्फत प्राप्त करून शहरासह जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या बेकायदा लागवडीवर लक्ष ठेवत आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य सचिव आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी समितीची बैठक पार पडली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डीआयएसएच), अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांच्या समन्वयाने विशेष पथके स्थापन करावीत. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये औषधनिर्माण कंपन्या आणि बंद पडलेले कारखाने इत्यादींची तपासणी करून अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध विभागाकडून जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी नऊ पथके तयार करून कारवाई केली जात आहे. शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी मुख्याद्यापकांना सूचना दिल्या आहेत. कृषी विभागाकडून ग्रामीण भागात गांजा, खसखस इत्यादी मादक पदार्थांची लागवड होणार नाहीत, याकरिता दक्षता पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून अंमली पदार्थ विरोधी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी या बैठकीत दिले.

हेही वाचा : लोणी काळभोरमधील इंधन कंपन्यांच्या टँकरमधून इंधन चोरणारी टोळी गजाआड, चोरलेल्या डिझेलची काळ्या बाजारात विक्री

गेल्या सात महिन्यांत केलेली कारवाई

पोलीस विभाग – दाखल गुन्हे व जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत

पुणे पोलीस आयुक्तालय –

गुन्हे दाखल – ६९
जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत – ३६७६ कोटी १४ लाख ९० हजार ४७०

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय –

गुन्हे दाखल – ८२
जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत – एक कोटी ८० लाख ६० हजार २४९

हेही वाचा : वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघे अटकेत, आरोपींकडून आठ पिस्तुलांसह १३ काडतुसे जप्त

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय –

गुन्हे दाखल ३५
जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत – ४२ लाख ३० हजार ६२८

पुणे रेल्वे पोलीस –

गुन्हे दाखल – २
जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत – एक लाख ११ हजार ३१२

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune two arrested for selling ganja 38 kg ganja seized pune print news rbk 25 css