पुणे : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. प्रवीण विकास कसबे (२९, रा. आंबेगाव, कात्रज) आणि प्रतीक दादासाहेब रणवरे (२५, रा. सद्गुरु रेसिडेन्सी, सिंहगड कॉलेजवळ, येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आकाश उद्धव कोपनर (रा. गोकुळनगर, कात्रज) या सराईत गुन्हेगारावरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल अरुण गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कोपनर हा सराईत गुन्हेगार आहे. गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गेल्या वर्षी बिबवेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तसेच कोपनर याच्यावर लूटमार केल्याचा दौंड पोलीूस ठाण्यात तर मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहे.

येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना, त्यांना दोन जण पिस्तूल विकत घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास येरवड्यातील वाडिया बंगल्याजवळ सापळा रचला. प्रवीण कसबे आणि प्रतीक रणवरे यांना आकाश कोपनर याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत घेताना पोलिसांनी पकडले. आकाश कोपनर हा पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके पुढील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune two arrested while purchasing pistol and cartridges from a criminal pune print news vvk 10 css