पुणे : भरधाव कंटेनरच्या धडकेत मोटार चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय बाळासाहेब चिव्हे (वय ३१, रा. संयाेग काॅलनी, काळेपडळ आणि अपेक्षा लाॅनजवळ, फुरसुंगी, पाॅवर हाऊसजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आाहे.याबाबत बाळासाहेब महादेव चिव्हे (वय ५९, रा. संयोग काॅलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंटनेर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय यांचे हडपसर भागातील काळेपडळ परिसरात मोबाइल विक्रीचे दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अक्षय हडपसर-सासवड रस्त्यावरुन मोटारीतून घरी निघाले होते. त्या वेळी फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहून कंटेनरने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारचालक अक्षय गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अक्षय यांचा उपचारांपूर्वीच मृत्य झाल्याची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune youth died in motor vehicle and container truck accident on saswad road pune print news rbk 25 css