पुणे : कोथिंबिर, अंबाडी, चुका, चवळईच्या दरात वाढ झाली आहे.चाकवत, मुळे, पुदिन्याच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत आहे. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १४ ते १५ टेम्पो गाजर, राजस्थान आणि प्रदेशातून मिळून २० ते २२ ट्रक मटार, आंध्र प्रदेशातून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा १२० ते १२५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून २८ ते ३० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, अंबाडी, चुका, चवळईच्या दरात वाढ झाली आहे. चाकवत, मुळे, पुदिन्याच्या दरात घट झाली आहे. मेथी, शेपू, कांदापात, करडई, राजगिरा, पालक, हरभरा गड्डीचे दर स्थिर आहेत, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात कोथिंबीर सव्वा लाख जुडी, मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ६०० ते १०००, मेथी -६०० ते १०००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात- ६०० ते १०००, चाकवत – ५०० ते ६००, करडई- ३०० ते ६००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ५०० ते ८००, राजगिरा- ३०० ते ६००, चुका – ६०० ते १०००, चवळई- ३००-७००, पालक- ५००- ८००, हरभरा गड्डी – ५०० ते १०००

लिंबू, मोसंबी महाग

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबू, मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. स्ट्राॅबेरीच्या दरात घट झाली आहे. अननस, संत्री, कलिंगड, खरबूज, पपई, चिकू, बोरे, डाळिं,, पेरुचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ३५ ते ४५ टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब २० ते २५ टन, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड ८ ते १२ टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू १०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ८ ट्रक, बाेरे ३०० गोणी अशी आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the price of vegetables at the wholesale market in shri chhatrapati shivaji market yard pune print news rbk 25 amy