पुणे : शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजविली. टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि ओरसे (वय ४२, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शन विक्री; ओैषध विक्रेत्याला अटक

ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang in wadarvadi create terror after vandalized vehicles pune print news rbk 25 zws