पुणे : श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट समालोचक कुमार संगकारा यांची प्रकृती ठणठणीत असून पुढील सामन्यात समालोचकाची भूमिका पार पाडण्यासाठी ते राजकोट येथे रवाना झाले आहेत. नुकत्याच पुणे येथे झालेल्या भारत श्रीलंका एक दिवसीय सामन्यासाठी आले असता बुधवारी शरीरातील पाण्याची कमी झालेली पातळी (डिहायड्रेशन) आणि ताप या लक्षणांमुळे संगकारा यांना हिंजवडी येथील रुबी हॅाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी प्रत्यक्ष सामन्यापूर्वी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर समालोचक म्हणून त्यांनी सामन्यात सहभागही घेतला. पुण्यातील सामना संपल्यानंतर राजकोट येथे होणाऱ्या पुढील सामन्यासाठी संगकारा रवाना झाले, अशी माहिती क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-01-2023 at 14:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar sangakkara health good reach rajkot for the next match pune print news bbb 19 ysh