पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या जुलै – ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १८ जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येईल. बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. तर व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत होईल. तर दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट यादरम्यान होईल. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही १८ जुलैपासून सुरू होणार आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भीमा-कोरेगाव प्रकरणात फडणवीस यांना चौकशीला बोलवणे, आठवलेंच्या तर्काने सर्वच चकीत

बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन ओक यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra board released ssc hsc supplementary exam 2023 time table pune print news ccp14 zws