देशाच्या पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य समान असले पाहिजे. त्यांनी सर्व राज्यांकडे मुलासारखे पाहिले पाहिजे. मी गुजराती म्हणून गुजरातला प्राधान्य देता कामा नये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका केली. महाराष्ट्र सर्वार्थाने पुढे आहे. एखादे दोन उद्योग गेले म्हणून काही नुकसान होणार नाही, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “…म्हणून मी हल्ली फार बोलत नाही”, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचं परखड मत

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ या विषयावर राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर आणि पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

हेही वाचा- राज ठाकरेंनी सोशल मीडियावर कमेंट्स करणाऱ्यांची घेतली फिरकी; म्हणाले, “त्यावर आता…!”

‘लाव रे तो व्हिडीओ ते भोंगाबंदी’ हा ‘यू-टर्न’ नाही का?’, या प्रश्नावर प्रत्येक गोष्टीला विरोध करायलाच हवा का?, असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला. कालपर्यंत एकमेकांना शिव्या घालणारे अडीच वर्षे सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसले होते त्यांना किंवा सकाळी सहा वाजता राजभवनवर जाऊन शपथ घेतली त्यांना असे का नाही विचारत?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ३७० कलम रद्द करणे आणि रामजन्मभूमी या विषयांमध्ये मी सरकारचे अभिनंदन केले आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra navnirman sena president raj thackeray criticizes pm narendra modi pune print news vvk 10 dpj