पुणे : मोबाइलवर ‘रिल्स’तयार करुन समाजमाध्यमावर प्रसारित करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पुण्यातील महंमदवाडी परिसरात भरधाव दुचाकीवर ‘रिल्स’ तयार करण्याच्या नादात दुचाकीच्या धडकेने एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भामा आसधेड धरण परिसरातील करंजेविहीरे गावात दुर्घटना घडली. धरणाच्या काठावर थांबून ‘रिल्स’ तयार करणारा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दत्ता भारती (वय २४, सध्या रा. वराळे, मूळ रा. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दत्ता आणि त्याचे वराळे गावातील तीन मित्र शनिवारी (११ मार्च) करंजविहिरे परिसरातील भामा आसखेड धरणावर गेले होते. दत्ता आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्रांनी धरणाच्या काठावर दारु प्याली. त्यानंतर दत्ताने धरणाचा काठावर थांबून मोबाइलवर ‘रिल्स’ तयार करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> पुणे: शिवणे भागात टोळक्याची दहशत; मोटारीच्या काचा फोडल्या

त्या वेळी पाय घसरुन दत्ता पाण्यात बुडाला. त्याच्या बरोबर असलेल्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. मित्रांना पोहता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. दत्ताचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. दत्ताचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Making reels youth dies after drowning in dam pune print news rbk 25 ysh